डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवरच्या भागीदारीची गरज – डॉ. एस जयशंकर

आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात विविध पातळ्यांवर गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होत असून त्यावर जागतिक पातळीवरच्या भागीदारीची गरज आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज तर्फे आज नवी दिल्लीत आयोजित भागीदारीविषयक परिषदेत ते बोलत होते. जगात सर्वच देशांना आव्हानं उभी राहत असून त्यावर एकेकट्यानं मात करणं अवघड आहे असं ते म्हणाले. 

 

युक्रेन रशिया युद्ध, अमेरिका आणि चीन दरम्यानचा व्यापारी संघर्ष, चलनवाढ, आणि कर्ज अशा विविध घटनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा उल्लेख त्यांनी केला. जागतिक पुरवठा साखळी, नवोन्मेष, आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी जगभरात पसरलेल्या भारतीय समुदायाच्या योगदानाचा गौरव केला.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.