कृत्रिम बुद्दीमत्तेची जबाबदारीने अंमलबजावणी करण्यासाठी विश्वास आणि सुरक्षितता आवश्यक असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘ट्रस्ट अँड सेफ्टी फेस्टिवल ऑफ इंडिया’ महोत्सवाला संबोधित करत होते.
आगामी काळात कृत्रिम बुद्दीमत्त्ता अर्थव्यवस्थांमध्ये परिवर्तन घडवेल, कामाच्या सवयी बदलेल, चांगल्या आरोग्यासाठी नवीन उपाय शोधेल आणि शिक्षणाची पोहोच वाढवेल, असं ते यावेळी म्हणाले. जीवनशैलीमधला कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला प्रभाव पाडेल, असं ते म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रशासनासाठी संतुलित दृष्टिकोन अंगिकारण्याची, तसंच नागरिकांची डिजिटल ओळख जपण्यासाठी सुरक्षेच्या प्रभावी उपायांची गरज त्यांनी अधोरेखित केली.