जयपूरात १७ वर्षांपूर्वी झालेल्या साखळी स्फोट प्रकरणी दोषींना जन्मठेप

राजस्थानात जयपूर इथे १७ वर्षांपूर्वी झालेल्या साखळी स्फोट प्रकरणात दोषी ठरलेल्या चार दहशतवाद्यांना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी ४ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत या चारही दहशतवाद्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. दहशतवाद हा समाजासाठी धोका असून अशा गुन्हेगारांना कोणतीही दया दाखवता येणार नाही, असं न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. जयपूरमधे १३ मे २००८ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता तर १८५ जण जखमी झाले होते. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.