डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 13, 2025 6:56 PM | JaiBhim Padyatra

printer

राज्यात जयभीम पदयात्रेचं आयोजन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या एक दिवस आधी राज्यासह देशभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढली जात आहे.  

 

आंबेडकर जयंतीनिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज मुंबईत भीम पदयात्रेत सहभागी झाल्या. नरिमन पॉइंट पासून  मंत्रालयातल्या आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत हजारो संख्येनं तरुण सहभागी झाले. 

 

आंबेडकर जयंतीनिमित्त ऐरोलीतल्या बाबासाहेबांच्या ज्ञानस्मारकाला भेट देणारी मोठी जनसंख्या विचारात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आलं आहे.

 

पालघर जिल्ह्यातही भीम पदयात्रा काढण्यात आली. 

 

रत्नागिरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातून जयभीम पदयात्रा काढण्यात आली. संविधान उद्देशिकेच्या वाचनानंतर या पदयात्रेचा समारोप झाला.  

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात जय भीम पदयात्रेचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झालं. या पदयात्रेत २५० विद्यार्थी स्वयंसेवक आणि विद्यापीठातले कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले.

 

नांदेड आणि बीड इथंही आज जिल्हा प्रशासन, जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयानं जय भीम पदयात्रा काढण्यात आली.

 

परभणी भीम पदयात्रा काढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतीगृहातल्या विद्यार्थिनींनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. परभणी शहरात उद्या आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.  

 

गोंदिया आंबेडकर जयंती निमित्त  बाईक रॅली काढत काढण्यात आली. या रॅलीची सुरवात गोंदिया शहराच्या भीम नगर ग्राउंड मधून करण्यात आली. उद्या आंबेडकर चौकात भव्य जयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे

 

धुळ्यात जय भीम पदयात्रा उत्साहात संपन्न झाली. पदयात्रेची सुरवात गरुड मैदान इथून झाली.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा