जागतिक युवा कौशल्य दिन आज साजरा केला जात असून स्किल इंडिया उपक्रमाचं भारताचं हे दहावं वर्ष आहे. प्रधानमंत्र्यांनी २०१५ मध्ये हा उपक्रम सुरू केला. तरूणांना रोजगार, उद्योजकता आणि शाश्वत उपजीविकेसाठी उद्योगाशी संबधित कौशल्यांनी सुसज्ज करण या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. यंदाची संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल कौशल्यांद्वारे युवा सक्षमीकरण ही आहे.
विविध क्षेत्रांमध्ये तरूणांना व्यावहारिकदृष्ट्या आणि विविध कौशल्यांद्वारे सक्षम बनविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली स्किल इंडियात नवनवीन बदल होत असल्याचं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. २०१५ पासून या योजनेअंतर्गत ३८ क्षेत्रांमध्ये एक कोटी साठ लाखांहून अधिक तरूणांना आतापर्यंत प्रशिक्षण देण्यात आलं.