गुजरातचे सहकार राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांची आज गांधीनगर इथल्या प्रदेश मुख्यालयात भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. माजी प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. विश्वकर्मा यांनी पक्ष नेतृत्वाचे मनापासून आभार मानले आणि एकता आणि सामूहिक जबाबदारीवर भर दिला. गुजरातच्या जनतेची सेवा करण्यासाठी बूथ-स्तरीय अध्यक्षांपासून ते जिल्हा नेत्यांपर्यंत प्रत्येक पक्ष कार्यकर्त्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
Site Admin | October 4, 2025 7:59 PM | Jagdish Vishwakarma
गुजरात जगदीश विश्वकर्मा यांची प्रदेश मुख्यालयात भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड
