क मूल्य साखळीतील एक विश्वासू भागीदार आणि अस्थिर जगासाठी एक स्थिर भक्कम आधार ठरण्याच्या योग्य मार्गावर असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं CII-ITC शाश्वतता पुरस्कार समारंभात ते काल बोलत होते.
उपराष्ट्रपती म्हणाले की, सध्या जगात गोंधळ आणि अशांतता आहे. जागतिक व्यवस्थेत सुधारणा होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पुरवठा साखळीत व्यत्यय येत आहे. अशा परिस्थितीत, भारत हा एक प्रमुख आवाज आहे.
भारताच्या शाश्वत विकासाच्या विकासावर प्रकाश टाकताना धनखड म्हणाले की, भारतात जगाच्या एक षष्ठांश लोकसंख्या नांदते, भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून राष्ट्राचा विकास कसा व्हावा याचा भारताने आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.
त्यांनी भारतीय उद्योगांना अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, वर्तुळाकार अर्थव्यवस्था प्रारूप आणि कार्बन बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करून हरित क्रांतीचे पथदर्शी होण्याचं आवाहन केलं.