वक्फ दुरुस्ती विधेयकाविषयी संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी जगदंबिका पाल यांची नियुक्ती

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ साठी गठीत करण्यात आलेल्या  संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदावर भाजपा  खासदार जगदंबिका पाल यांची नियुक्ती केली आहे. विधेयकावर पुढल्या पडताळणीसाठी ३१ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करेल.