जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला प्रचार शिगेला

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातला प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या टप्प्यात ४० मतदारसंघांमधे येत्या १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आकाशवाणीच्या जम्मू वार्ताहरानं कळवलं आहे की, विविध राजकीय पक्षांनी प्रचारसभा, आणि रोड शोचा धडाका लावला आहे. मतदारांशी वैयक्तिक भेटून प्रचारावरही भर दिला जात आहे. भाजपाचे प्रमुख प्रचारक, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा उद्या जम्मूच्या मौलाना आझाद स्टेडियममधे होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभा आज रामगढ आणि छांब इथं होणार आहेत. मतमोजणी येत्या ८ ऑक्टोबरला होणार आहे.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.