डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हमास दहशतवादी हल्ल्यास एक वर्ष पूर्ण

गाझा पट्ट्यात हमास या अतिरेकी संघटनेनं इस्त्राईलवर हल्ला केला त्यास आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्लयात इस्‍त्राईलच्या १२०० नागरिकांचा मृत्यु झाला होता. तेव्हापासून पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे. त्यात आतापर्यंत ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी जीव गमावला आहे.

संयुक्‍त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी हमास संघटनेनं ओलीस ठेवलेल्या इस्‍त्रायली नागरिकांची विनाशर्त सुटका करण्याचं आवाहन केलं आहे. या युद्धामध्ये आता लेबनॉनसह इराणही सहभागी झाल्यामुळं त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे संयुक्‍त राष्ट्र संघानं चिंताही व्यक्त केली आहे.
दरम्यान इस्राएलनं लेबनॉनवरचे हल्ले अधिक तीव्र केले आहेत.