ITI मध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करायला केंद्र सरकारची मान्यता

राज्यातल्या ITI अर्थात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यानुसार आता ७० ITI मध्ये सोलर टेक्निशियन, ईव्ही मेकॅनिक हे नवीन अभ्यासक्रम  शिकविण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. खाजगी औद्योगिक आस्थापनांच्या सहाय्याने राज्यातल्य़ा ३६ जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दर्जावाढ करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.