डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकावर आधारित ज्ञान देणं गरजेचं

देशात प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकावर आधारित ज्ञान देणं गरजेचं आहे. ज्या देशात प्रात्यक्षिक ज्ञान घेऊन संशोधन होते, त्या ठिकाणी प्रगती आणि समृद्धी दिसून येते, असं मत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.

 

मुंबई विद्यापीठात काल झालेल्या ‘विकास २०२५’ परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत, शिक्षण आणि उद्योगाला एकत्र आणून एका मजबूत प्रणालीची निर्मिती करणं, तसंच विद्यार्थ्यांना उद्योगासाठी अधिक सक्षम बनवून  देशाच्या विकासात सक्रिय योगदान देण्यायोग्य बनवण्याबाबत विचारविनिमय झाला. या परिषदेत अनेक शिक्षण संस्थांचे प्रमुख, शिक्षण तज्ञ उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा