सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचं राज्याच्या पणन विभागाकडून स्पष्ट

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचं राज्याच्या पणन विभागानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी आधी १३ जानेवारीपर्यंत मुदत होती; ती संपल्यानंतर केंद्र शासनाने २४ दिवसांची म्हणजे दिनांक ६ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याचं वृत्त काही माध्यमांमधून देण्यात आलं होतं; त्यावर ६ फेब्रुवारीनंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही असं पणन विभागानं स्पष्ट केलं आहे.