आपल्या संकेतस्थळावर चुकीचे मानांकन प्रसिद्ध केल्याबद्दल नॅक अर्थात राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेनं फरीदाबाद इथल्या अल फलाह विद्यापीठाला कारणे दाखवला नोटीस बजावली आहे. अल फलाह विद्यापीठ मूल्यांकन आणि मानांकन करण्यासाठी मान्यताप्राप्त नाही असं नॅकने म्हटलं आहे. विद्यापीठाने संकेतस्थळ किंवा इतर कुठल्याही कागदपत्रावरून नॅक मानांकन काढून टाकावं असे निर्देश नॅकने दिले आहेत. दिल्ली स्फोट प्रकरणात अल फलाह विद्यापीठाचं नाव गुंतल्यामुळे विद्यापीठाच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष दिलं जात आहे.
Site Admin | November 13, 2025 5:52 PM | Al Falah University | Faridabad | show cause notic
चुकीचे मानांकन प्रसिद्ध केल्याबद्दल अल फलाह विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस