कतारची राजधानी दोहा इथं आजपासून ISSF आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषकाच्या अंतिम स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत विश्वविजेता नेमबाज सम्राट राणा याच्या नेतृत्वाखाली १५ भारतीय नेमबाजांचा संघ सहभागी झाला आहे. या संघात मनु भाकर, सुरुची सिंह यांसारखे आघाडीचे नेमबाज आहेत.
यंदाच्या वर्षात भारतीय नेमबाजांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. या वर्षी सम्राट राणा, ऐश्वर्य तोमर आणि एलावेनिल वलारिवन यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. ISSF आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतीम फेरीत भारताचे ९ पिस्तूल नेमबाज, ५ रायफल नेमबाज आणि एक शॉटगन खेळाडू पात्र ठरले आहेत. त्यामुळे भारताला पदक मिळण्याची संधी आहे.