ISSF World Cup 2025 : आर्या बोरसे आणि अर्जुन बबुताला सुवर्ण पदक

ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आर्या बोरसे आणि अर्जुन बबुतानं सुवर्ण पदक पटकावलं. जर्मनीतल्या म्युनिचमध्ये १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत त्यांनी ही कामगिरी केली. 

 

स्पर्धेतलं भारताचं दुसरं सुवर्ण आणि एकूण चौथं पदक आहे. यापूर्वी सुरूची सिंगनं सुवर्ण पदक पटकावलं असून सिफ्ट कौर समरा आणि एलावेनिलनं कांस्य पदक जिंकलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.