आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेच्या आजच्या शेवटच्या दिवशी भारताची सुरुची सिंह हिनं महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली, तर संयम हिनं रौप्यपदक पटकावलं. सुरुची हिनं २४५ पूर्णांक १ गुण मिळवले, तर संयम हिनं २४३ पूर्णांक ३ गुणांचा वेध घेतला. ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पटकावणारी मनू भाकर पाचव्या स्थानावर राहिली. महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये एलावेनिल वलरिवन हिला पात्रता फेरीत नववं स्थान मिळालं. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात माजी जगज्जेता रुद्रांक्ष पाटील याचं पदक थोडक्यात हुकलं, तसंच अर्जुन बबुता याला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
Site Admin | December 6, 2025 8:31 PM | Air Pistol
ISSF World Cup: एअर पिस्टल प्रकारात सुरुची सिंहची सुवर्णपदक, तर संयमला रौप्यपदक