इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा रविंदर सिंह यानं सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यानं पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात ५६९ गुणांची कमाई करत पहिलं स्थान पटकावलं. तसंच, रविंदर सिंह, कमलजीत आणि योगेश कुमार यांच्या संघानं पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात १ हजार ६४६ गुण मिळवून रौप्यपदकावर नाव कोरलं.
Site Admin | November 8, 2025 6:37 PM | ISSF World Championship
ISSF World Championship : भारताचा रविंदर सिंह याची सुवर्णपदकाला गवसणी