आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या कनिष्ठ गट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून उद्यापासून मुख्य स्पर्धा सुरु होत आहेत. भारतीय चमूत ६९ खेळाडू आहेत. डॉ. करणी सिंग शूटिंग रेंज इथे ही स्पर्धा होत असून ती २ ऑक्टोबर पर्यंत चालेल. भारतासह अमेरिका,इटली,इराण,ब्रिटन कतार,स्पेन अशा मान्यवर देशातले २१ वर्षाखालचे खेळाडू या स्पर्धेत रायफल ,पिस्टल,शॉटगन असा विविध क्रीडाप्रकारात आपलं नैपुण्य पणाला लावतील. कनिष्ठ गट विश्वचषकाची ही ११वी खेप असून भारतात ती पहिल्यांदाच होत आहे.
Site Admin | September 24, 2025 8:17 PM | ISSF Shooting World Cup
ISSF Junior World Cup: ज्युनियर विश्वचषक स्पर्धा नवी दिल्लीत सुरू
