इजिप्तमध्ये कैरो इथे सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सम्राट राणा याने काल सुवर्णपदक जिंकलं. त्याने २४३ पूर्णांक ७ गुणांची कमाई केली. एअर पिस्तुल गटात वैयक्तिक जागतिक विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
याच स्पर्धेत वरुण तोमरला कांस्यपदक मिळालं आहे. या दोन्ही नेमबाजांनी पात्रता फेरीत प्रत्येकी ५८६ गुणांची कमाई केली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकाराच्या सांघिक स्पर्धेतही भारताच्या सम्राट राणा, वरुण तोमर आणि श्रवण कुमार यांनी सुवर्ण पदक पटकावलं.
महिलांच्या गटात मनू भाकर, ईशा सिंग आणि सुरुची सिंग या तिघींनी सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळवलं. या पदकांसह भारताची पदकसंख्या ९ झाली असून त्यात तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.