आयएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघानं आयोजित केलेल्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं सात पदकं जिंकत तिसरं स्थान पटकावलं आहे. यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.
सिमरनप्रीत कौर ब्रार हिनं २५ मीटर पिस्टल प्रकारात रौप्य पदक पटकावत स्पर्धेचा शेवट गोड केला. अमेरिका एकूण सात पदकं जिंकत स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर चीनने चार सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकांची लयलूट करत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.