ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद – २०२५ स्पर्धा आजपासून ग्रीसमध्ये अथेन्स इथं सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताचे १२ खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत ६८ देशांतले ४०० पेक्षा जास्त नेमबाज सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेते खेळाडू वर्षाअखेरीस दोहा इथं होणाऱ्या ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सहभागी होतील.
Site Admin | October 8, 2025 3:03 PM
ISSF स्पर्धा आजपासून ग्रीसमध्ये अथेन्स इथं सुरू