सामाजिक सुरक्षा क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा इस्सा अर्थात आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना पुरस्कार यंदा भारताला प्रदान करण्यात आला. मलेशियात क्वालालंपूर इथं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार प्रत्येक भारतीयाच्या सामाजिक कल्याणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं प्रतीक आहे, असं मांडवीय यांनी यावेळी सांगितलं. देशातल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक सुरक्षेचा लाभ पोहोचला, असंही ते म्हणाले.
Site Admin | October 3, 2025 1:31 PM | ISSA Award 2025
आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना (इस्सा) पुरस्कार भारताला प्रदान