डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 9, 2025 2:53 PM | ISRO

printer

स्पेडेक्स मोहिमे अंतर्गत दोन उपग्रहांच्या जोडणीचा प्रयोग लांबणीवर

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था -इस्रोनं स्पेडेक्स मोहिमेच्या अंतर्गत पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत फिरणाऱ्या दोन उपग्रहांचं डॉकिंग म्हणजे जोडणीचा प्रयोग लांबणीवर टाकला आहे. दोन उपग्रहांमधलं अंतर जास्त वाढल्यामुळे हा प्रयोग पुढे ढकलावा लागल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे.

 

इस्रोनं यापूर्वी हा प्रयोग सात जानेवारीला घेण्याचं जाहीर केलं होतं, मात्र तेव्हाही या वाढलेल्या अंतरामुळे तो पुढे ढकलून आज घेण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता पुढचा प्रयोग कधी होईल हे लवकरच जाहीर केलं जाईल असं इस्रोनं म्हटलं आहे.