January 7, 2026 1:47 PM

printer

इस्रोच्या पीएसएलव्ही-C-62 अंतराळ यानाचं उड्डाण येत्या १२ जानेवारीला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोच्या पीएसएलव्ही-C-62 अंतराळ यानाच उड्डाण येत्या १२ जानेवारीला होणार आहे. आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्राच्या तळावरुन सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी हा प्रक्षेपक  अंतराळात झेपावेल अशी माहिती इस्रोनं समाज माध्यमावर दिली आहे.  या मोहिमेतील मुख्य पेलोड म्हणजे पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-N1 हा आहे. हा उपग्रह संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसाठी छायाचित्रे घेण्याचं काम करणार आहे. या प्रक्षेपकाद्वारे  भारतासह इतर देशांचे १८ उपग्रह अंतराळात पाठवण्यात येणार आहेत.