इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि अमेरिकेच्या नासा यांचा संयुक्त उपक्रम असलेला नासा – इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार म्हणजे, ‘निसार’ या उपग्रहाचं आज संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे. काल दुपारी दोन वाजल्यापासून त्याची उलटगणती सुरु झाली. या उपग्रहाच्या माध्यमातून दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचं निरीक्षण करण्यात येणार असून, हवामान बदल, संशोधन आणि आपत्ती प्रतिसादासाठी उच्च प्रतीच्या प्रतिमा मिळणार आहेत. सेंटीमीटर पातळीवर अचूकतेसह पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या बदलांचा मागोवा घेण्यासाठी यामध्ये नासाचा एल – बँड आणि इस्रोचा एस – बँड हे रडार आहेत.
Site Admin | July 30, 2025 5:40 PM
इस्रो आणि नासाचा संयुक्त उपक्रम, ‘निसार’ या उपग्रहाचं आज प्रक्षेपण