October 27, 2025 7:25 PM | ISRO

printer

इस्रोनं एलव्हीएम ३ हे प्रक्षेपक वाहन सतीश धवन अंतराळ केंद्रातल्या लाँच पॅडवर पोहचवलं

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो नं एलव्हीएम -३ हे प्रक्षेपक वाहन श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातल्या लाँच पॅडवर पोहचवलं आहे. या प्रक्षेपक वाहनाची जुळवणी पूर्ण झाली असून ते २ नोव्हेंबरला  अवकाशात प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या CMS 03 या दूरसंचार उपग्रहाशी जोडलेले आहे. हा उपग्रह भारताच्या महासागर क्षेत्रात संवाद वाढवेल आणि दुर्गम भागात डिजिटल सेवा उपलब्ध करून देईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.