गगनयान मोहिमेअंतर्गत पहिली मानवरहित मोहीम याच वर्षी डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी आज बेंगळुरूत दिली. मोहिमेच्या या टप्प्यात अंतराळयानाच्या तपासणीसाठी यात यंत्रमानवाला पाठवलं जाईल. अशा आणखी दोन मोहिमा होतील, त्यानंतर २०२७ च्या सुरुवातीला मानवाला घेऊन गगनयान अवकाशात झेपावेल, असंही नारायणन यांनी नमूद केलं. गगनयान मोहिमेसाठीचं ८० ते ८५ टक्के काम पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय, भविष्यात मानवाला चंद्रावर घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या रॉकेटवरही इस्रो काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | September 19, 2025 8:22 PM | Gaganyaan Mission | ISRO