भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या गगनयानाची पहिली चाचणी यंदाच्या डिसेंबरमध्ये होईल अशी माहिती इसरोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. यामध्ये आतापर्यंत सुमारे ७ हजार ७०० चाचण्या घेण्यात आल्या असून पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत उर्वरित २ हजार ३०० चाचण्या घेतल्या जाणार आहेत असं ते म्हणाले. अमेरिकेचा ६ हजार ५०० किलो वजनाचा संवाद उपग्रह भारतीय लॉन्चपॅडवरून प्रक्षिप्त केला जाणार आहे तसंच आदित्य L1 मधून वैज्ञानिक समुदायाला या वर्षभरात 13 टेराबिट्स डेटा प्रदान करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | August 22, 2025 1:29 PM | ISRO
भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या गगनयानाची पहिली चाचणी यंदाच्या डिसेंबरमध्ये होईल
