डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 11, 2025 1:24 PM | ISRO

printer

ॲक्झिऑम ४ मोहिमेच्या रॉकेटमध्ये त्रुटी आढळल्यानं यानाच्या प्रस्थानाला पुन्हा विलंब

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तिघांना आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात नेण्यासाठीची ॲक्झिओम-४ ही मोहीम दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. या मोहिमेचा आरंभ भारतीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी साडेपाच वाजता होणार होता, मात्र फाल्कन ९ रॉकेटची चाचणी करत असताना यात द्रव ऑक्सिजनची गळती आढळून आल्यानं मोहीम स्थगित करण्याचा निर्णय नासानं घेतला.

 

रॉकेटची डागडुजी पूर्ण झाल्यानंतर मोहिमेची नवी तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती नासानं दिली. याआधी या मोहिमेची सुरुवात मंगळवारी होणार होती, मात्र खराब हवामानामुळे ही मोहीम एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली होती.