December 24, 2025 2:54 PM | ISRO

printer

इसरोकडून अमेरिकन दळणवळण उपग्रह ब्लु बर्ड ब्लॉक २ चं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो ने आज अमेरिकन दळणवळण उपग्रह ब्लु बर्ड ब्लॉक २ चं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ स्थानकावरून भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. 

 

अमेरिकी ब्ल्यूबर्ड उपग्रह हा भारतीय अंतराळयानाने प्रक्षेपित केलेला आजवरचा सर्वात जड उपग्रह असून हे प्रक्षेपण अतिशय अचूकतेने झाल्याबद्दल इसरो चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सर्व सहभागी तंत्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. 

 

उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात इसरो चं अभिनंदन केलं आहे. भारताची जड उपग्रह प्रक्षेपीत करण्याची क्षमता या प्रक्षेपणाद्वारे जगासमोर आली असून भारत आता व्यावसायिक प्रक्षेपणक्षेत्रातही आघाडी घेत असल्याबद्दल त्यांनी इसरो ची  प्रशंसा केली आहे. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही इसरो च्या सर्व वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांचं  अभिनंदन केलं असून या प्रक्षेपणातून आत्मनिर्भर भारतासाठी आपले प्रयत्न दिसून येतात असं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.