डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 8, 2025 1:41 PM

printer

गाझा शहराचा ताबा घेण्याच्या नेतान्याहूंच्या प्रस्तावाला इस्राइलच्या संरक्षण मंत्रिमंडळाची मंजुरी

इस्राएलच्या संरक्षण मंत्रालयाने गाझा शहराचा ताबा घेण्याचा प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. युद्ध थांबवण्यासाठी ५ कलमी कार्यक्रम या प्रस्तावात मांडला आहे. हमासचं पूर्ण निरस्त्रीकरण, गाझातलं सैन्य बाद करणं, सर्व ओलिसांची सुटका, गाझावर इस्राएलचं संपूर्ण लष्करी नियंत्रण, आणि हमास किंवा पॅलेस्टीनचं काहीही नियंत्रण नसलेली नागरी प्रशासन व्यवस्था उभारणं या कलमांचा त्यात समावेश आहे. 

 

इस्राएली सैन्य गाझाचा ताबा घेण्याच्या तयारीत असून, युद्धभूमीबाहेर नागरिकांना मानवतावादी सहाय्य पुरवत राहील.

 

दरम्यान संरक्षण मंत्रालयाची बैठक सुरु असताना या निर्णयाच्या विरोधात पूर्ण इस्राएलमधे मोठ्या प्रमाणात निदर्शनं होत आहेत. गाझात हमासच्या कैदेत असलेल्या ओलिसांचे कुटुंबीयदेखील या निदर्शनांमधे सहभागी झाले असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. ओलिसांना सुखरुप परत आणण्यासाठी समझोता करावा अशी त्यांची मागणी आहे.