October 14, 2024 10:18 AM | Lebanon

printer

दक्षिण लेबेनॉनमधील शांती सेना दूर हलवण्याची इस्रायलची विनंती

संयुक्त राष्ट्र संघाच्या दक्षिण लेबेनॉनमधील शांती सेना तिथून दूर हलवण्याची विनंती इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेजामीन नेतन्याहू यांनी संयुक्त राष्ट्र संघांचे अध्यक्ष आंतोनियो गुटेरास यांना काल केली.

 

गेल्या काही दिवसांत इस्रायलने लेबेनॉन मध्ये केलेल्या गोळीबारात शांतीसेनेचे पाच जवान जखमी झाले,मात्र तरीही शांतीसेनेने मागे हटण्यास नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही विनंती करण्यात आली आहे. इस्राएल आणि लेबेनॉन मधील संघर्षात शांतीसेनेची हानी होऊ नये हा या विनंतीमागचा उद्देश आहे.