डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षणमंत्री योव गॅलंट यांना पदावरून हटवलं

इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षणमंत्री योव गॅलंट यांना पदावरून हटवलं आहे. नेतन्याहू यांनी गॅलंट यांच्यावर इस्रायल कॅबिनेटच्या विरोधात निर्णय घेतल्याचा आणि अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या शत्रूंना मदत केल्याचा आरोप केला आहे. गॅलंट यांच्या जागी परराष्ट्रमंत्री इस्रायल काट्झ यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर गिदोन सार परराष्ट्र मंत्री म्हणून पदभार स्वीकारतील. इस्रायलची सुरक्षा हे माझे आयुष्यभराचे मिशन होते आणि राहील असं गॅलंट यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. या घोषणेमुळे इस्रायलमध्ये निदर्शनं सुरू झाली असून देशांतर्गत तणाव वाढला आहे.