डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 9, 2025 8:01 PM | Hamas | Israeli

printer

युध्दविरामासाठी गाझाच्या मुख्य भागातून इस्त्रायली फोजांची माघार सुरु

हमास आणि इस्रायलमधल्या युध्दविरामाचा भाग म्हणून गाझाच्या  मुख्य भागातून इस्त्रायली फौजेच्या तुकड्या आजपासून परतायला लागल्या आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी ही माहिती देताना या युध्दविरामाच्या करारानुसार आपण पावलं उचलत असलो तरी या कराराची पुढची वाटचाल ही दोन्ही बाजूंवर अवलंबून  असल्याचं नमूद केलं. युद्धविरामाचा भाग म्हणून पॅलेस्टिनी नागरिकांना नेतझरिम हद्द ओलांडून उत्तरेकडच्या भागात जाण्याची परवानगी इस्रायलने दिली आहे. गेले पंधरा महिने सुरु असलेल्या या संघर्षाला विराम  मिळाल्याच्या भावनेने अनेक पॅलेस्टिनी पायी किंवा गाड्यांनी परतत आहेत. गाझातून इस्रायली फौजा पूर्णपणे माघारी गेल्यावर कराराच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ओलिसांची सुटका केली जाईल.