डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 20, 2024 8:36 PM | Israeli

printer

इस्रायलनं गाझाच्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ८७ जणांचा मृत्यू

इस्रायलनं गाझाच्या उत्तर भागातल्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ८७ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. मदत आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती गाझा सरकारच्या माध्यम कार्यालयानं दिली आहे. इस्राईल लष्करानं गाझाच्या उत्तर भागात सुरू केलेल्या मोहिमेमुळे या परिसरात अन्न, पाणी आणि वैद्यकीय सेवांसारख्या अनेक सुविधा खंडित आहेत. इस्राईलच्या सुरक्षा दलांनी मात्र हमासच्या आरोपांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संख्या वाढवून सांगितली जात असल्याचा दावा केला आहे.