इस्रायलचा दक्षिण लेबनॉनमधल्या हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र तळावर हल्ला

इस्रायलच्या हवाई दलाने काल दक्षिण लेबनॉनमधल्या हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र तळावर हल्ला केला. हिजबुल्लाहबरोबरच्या बुधवारी लागू झालेल्या युद्धविरामाचे हे उल्लंघन आहे, असं लेबनॉनने म्हटलं आहे.  बुधवारी आणि गुरुवारी इस्रायलने अनेकदा युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोपही लेबनॉनने केला आहे. अमेरिका आणि फ्रान्सच्या प्रयत्नांमुळे लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात ६० दिवसांचा युद्धविराम घोषित झाला आहे.