इस्रायली हवाई हल्ल्यात गाझा पट्टीमध्ये मागच्या दोन दिवसात 90 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 278 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सोमवारच्या एका हल्ल्यात एकाच कुटुंबातील 19 जण मरण पावले, असं एका रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सिरीया मध्येही रविवारी हल्ले सुरु झाल्यापासून अंदाजे 100 जण मृत्युमुखी पडले आहेत. लेबेनॉनमध्येही इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये किमान 12 लोक ठार आणि आठ जखमी झाले अशी माहिती लेबेनॉनच्या अधिकाऱ्यांनी आणि माध्यमांनी दिली आहे.