डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 6, 2025 6:25 PM | Gaza | Israel

printer

ओलीस ठेवलेल्या बंधकांच्या सुटकेसाठी इस्त्रायल नागरिकांची निदर्शनं

गाझामध्ये अद्याप ओलीस ठेवलेल्या इस्त्रायली बंधकांच्या सुटकेसाठी इस्त्रायल सरकारनं हमाससोबत वाटाघाटी कराव्यात या मागणीसाठी इस्त्रायलचे हजारो नागरिक दररोज निदर्शनं करत आहेत. ओलीस ठेवलेल्या बंधकांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविराम करावा या मागणीला सुमारे ६९ टक्के इस्रायलींनी पाठिंबा दर्शवल्याचं एका सर्वेक्षणात दिसलं आहे. तेल अवीव इथं नुकत्याच झालेल्या रॅलीत या निदर्शकांनी युद्धविराम आणि वाटाघाटी करण्याची मागणी केली. तर गेल्या २४ तासांत इस्त्रायलनं केलेल्या हवाई आणि जमिनीवरच्या  हल्ल्यांमुळे ६० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल्याचं गाझा मधल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू येत्या सोमवारी व्हाईट हाऊसला भेट देणार असून या भेटीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होणाऱ्या चर्चेदरम्यान गाझा युद्धविराम हा मुख्य मुद्दा असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.