इस्राएलनं मध्यरात्रीच्या सुमारास येमेनच्या होदेइदाह प्रांतात लाल समुद्रातल्या अनेक बंदरांवर हवाई हल्ले केले. हा भाग तत्काळ रिकामा करण्याबाबत समाज माध्यमावर इशारा दिल्यानंतर काही वेळातच इस्राएलच्या सैन्याकडून हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात हूतींचे गड मानले गेलेल्या होदेइदाह, अस सालिफ अशा भागांना लक्ष्य करण्यात आल्याचं इस्राएलच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. २०२३ मध्ये हे प्रदेश हूतींनी ताब्यात घेतले होते. इराणमधून शस्त्रांची आयात करण्यासाठी या बंदरांचा वापर केला जात होता.
Site Admin | July 7, 2025 2:33 PM | Airstrikes | Israel | Yemen
येमेनच्या होदेइदाह प्रांतात लाल समुद्रातल्या अनेक बंदरांवर इस्राएलचे हवाई हल्ले
