इस्रायलने उत्तर गाझामधे केलेल्या हल्ल्यात ९ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने उत्तर गाझामधे आज केलेल्या हल्ल्यात ९ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, आपण हमास आणि इस्लामिक जिहाद केंद्राला लक्ष्य केल्याचं इस्त्रायलनं म्हटलं आहे. गाझा पट्टीत इतर भागात झालेल्या हल्ल्यात सहा जणांचं कुुटुंब तसंच छावणीत राहणारे पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत. इस्रायलने १९ मार्चला गाझा पट्टीवर पुन्हा हल्ला सुरू केल्यानंतर १ हजार ९७८ जणांचा मृत्यू झाल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.