इस्राईल आणि इराण यांच्यातला संघर्ष वाढत असून दोन्ही देश एकमेकांच्या पायाभूत सुविधा केंद्र आणि रहिवासी वस्त्यांवर हल्ले करत असल्याने संघर्षाची तीव्रता वाढत आहे. इस्राइलनं इराणची राष्ट्रीय प्रसारण सेवा संस्था इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईराण ब्रॉडकास्टिंग, आयआरआयबीवर हल्ले केले. इस्राएलच्या पायाभूत सुविधा केंद्रांवर इराणनं केलेल्या हल्ल्यांना प्रत्त्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं इस्राएलच्या सैन्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
इस्राइलनं हवाई हल्ले थांबवावे याकरता अमेरिकेनं हस्तक्षेप करावा असं आवाहन इराणनं केलं आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या अणु निरीक्षकांच्या प्रमुखांनी इराणच्या सर्वात मोठ्या युरेनियम समृद्धीकरण केंद्राचं मोठं नुकसान झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.