डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 16, 2025 2:20 PM | Israel-Iran War

printer

इस्रायल – इराण युद्ध सुरूच

इस्रायल – इराण युद्धाचा आज चौथा दिवस आहे. तणाव कमी करण्याच्या अनेक देशांच्या आवाहनानंतरही दोन्ही बाजूंनी रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा सुरुच होता. आज सकाळी इस्रायली तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ला झाला त्यामुळे पॉवर ग्रिडचा काही भाग खराब झाला.

 

इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायलचे २० जण ठार झाले असून ३८० जण, मॅगेन डेव्हिड अ‍ॅडोम या इस्राएली सूत्रांनी दिली. इस्रायली हल्ल्यांमुळे इराणमध्ये किमान २२४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि बाराशे पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

 

इस्रायलला पाश्चात्य देशांनी मदत केल्यास संपूर्ण प्रदेशातील अमेरिका, ब्रिटन आणि फ्रेंच लष्करी मालमत्तेला लक्ष्य केलं जाऊ शकतं, असा इशारा इराणने दिल्यामुळे तणाव वाढला आहे.