डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 21, 2025 2:42 PM | Israel-Iran War

printer

इस्राएलनं केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका- राफेल ग्रोसी

इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर इस्राएलनं केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका असल्याचं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी म्हटलं आहे. इराणमधल्या अणुप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे तिथल्या आण्विक सुरक्षेत घट झाली आहे, मात्र गळती होणाऱ्या क्ष-किरणांनी अजूनही धोकादायक पातळी ओलांडली नसल्याचं ग्रोसी यांनी सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत  सांगितलं.