इस्रायलनं आज सकाळी हमासवर केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा प्रवक्ता अब्देल लतिफ अल कुनोवा ठार झाला. त्याच्या कुटुंबातले ६ सदस्यही या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती हमासनं दिली आहे. इस्रायली विमानांनी आज सकाळी गाझाच्या उत्तरेला असलेल्या जबालिया इथल्या तंबूवर केलेल्या हल्लात तो ठार झाला. गाझा शहरावर झालेल्या दुसऱ्या एका हल्ल्यात ४ मुले व त्यांचे पालक ठार झाल्याचं गाझाच्या आरोग्य विभागानं सांगितलं.
Site Admin | March 27, 2025 8:30 PM | israel hamas war
इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासचा प्रवक्ता अब्देल लतिफ अल कुनोवा ठार
