इस्राएलचं लष्कर गाझा पट्टीत आपल्या ताब्यातल्या प्रदेशात हमासविरोधातली कारवाई आणि त्यांनी बनवलेली भुयारं नष्ट करण्याचं काम सुरूच ठेवणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी म्हटलं आहे. राफाहमध्ये अडकलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना गाझामध्ये त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात परतण्याची परवानगी द्यावी, असं आवाहन अमेरिकेनं केलं होतं. त्यानंतर काट्झ यांनी ही भूमिका जाहीर केली. गाझा पट्टीचं नि:शस्त्रीकरण करणं, तसंच मृत ओलिसांचे मृतदेह परत मिळवणं हे इस्राएलचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | November 6, 2025 1:39 PM | Hamas | Israel
गाझा पट्टीत हमासविरोधातली कारवाई सुरूच ठेवणार असल्याची इस्राएलची घोषणा