इस्रायलनं गाझावर आज केलेल्या हल्ल्यात किमान ३३ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. हमासनं गाझात इस्राएली सैनिकांवर हल्ला केल्यावर आणि मरण पावलेल्या ओलिसांचे मृतदेह परत देण्याचं नाकारल्यावर हे पाऊल उचलल्याचं इस्राएलचे संरक्षण मंत्री इस्राएल कात्झ यांनी सांगितलं. हमासनं हे आरोप फटाळून लावले आहेत. इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी या हल्ल्याचे आदेश सैन्याला दिले असल्याची माहिती अमेरिकेला दिली होती असं अमेरिकेच्या सूत्रांनी सांगितलं.
Site Admin | October 29, 2025 1:33 PM | Gaza | Israel
इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यात ३३ पॅलेस्टिनी नागरिक ठार