इस्राएलनं हमासच्या अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी गाझा शहरातून नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरु केली असून, पॅलेस्टिनी नागरिकांना शहरातून बाहेर जाण्यासाठी ४८ तासांचा अतिरिक्त मार्ग खुला केल्याची माहिती इस्रायली लष्करानं काल दिली.
गाझा शहरात हजारो नागरिकांनी आश्रय घेतला असून, शहर सोडल्यावर पुढे येणारी संकटं, तसंच अन्नाचा तुटवडा आणि कायमचं विस्थापित होण्याची भीती, यामुळे शहर सोडून जायला ते घाबरत आहेत.
गाझा पट्ट्यात काल इस्राएलनं केलेल्या हल्ल्यात जवळजवळ ६३ नागरिक मृत्युमुखी पडले, त्यापैकी बहुतेक जण गाझा शहरातले होते, अशी माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे इस्रायल आणि हमास दरम्यानच्या गेल्या दोन वर्षांच्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांची संख्या ६५ हजारावर वर गेली आहे.