डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 30, 2025 1:34 PM | Gaza | Israel

printer

इस्रायलची गाझामध्ये ६० दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावाला सहमती

इस्रायलने गाझामध्ये ६० दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावाला सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेने जाहीर केलं आहे. व्हाईट हाऊसच्या माहिती सचिव, कॅरोलिन लेविट यांनी माध्यमांना काल ही माहिती दिली. मध्य पूर्वेतील अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत हमासला युद्धबंदी प्रस्ताव सादर केला. त्याला इस्रायलने मान्यता दिल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रस्तावात ६० दिवसांच्या युद्धबंदीचा, १० जिवंत ओलिसांची सुटका करण्याचा आणि १८ मृत ओलिसांच्या अवशेषांना मायदेशी परत करण्याचा समावेश आहे. मात्र हमासने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ताज्या प्रस्तावाला नकार दिला आहे. अमेरिका युद्ध संपवण्यासह मुख्य मागण्या पूर्ण करत नाहीत, असा हमासचा आरोप असल्यचंही त्या म्हणाल्या.