January 18, 2025 9:39 AM | Israel

printer

इस्रायल संरक्षण मंत्रिमंडळाकडून युद्धविरामाला मंजुरी

इस्राईलच्या संरक्षणविषयक मंत्रिमंडळानं काल हमास बरोबर युद्धकैद्यांची सुटका आणि युद्धविरामाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने सरकारला तशी शिफारस केली आहे. गाझाच्या इतिहासात सर्वात घातक संघर्षापैकी एक असलेला संघर्ष संपवण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल असेल. कतार, अमेरिका आणि इजिप्त यांनी वाटाघाटीतून झालेल्या या करारामुळे दोन्ही बाजूंकडे मोठ्या प्रमाणात झालेल्या जिवीतहानीचा संघर्ष थांबेल.

 

इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं काल दिलेल्या माहितीनुसार, संरक्षणविषयक मंत्रिमंडळानं सर्व राजकीय, सुरक्षा आणि मानवतावादी पैलूंचं मूल्यांकन केल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे. प्रस्तावित करार रविवारपासून अंमलात येईल. या कराराला अंतिम मंजुरी देण्यासाठी आज इस्रायली मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.